Thursday, March 27

रात

रात चांदण्यांनी भरलेली, अंगणी माझ्या उतरलेली
एकटीच रे मी आहे, म्हणून ओक्साबोक्शी रडलेली..

मी विचारले तिला, भर चांदण्यात नाहलेली
मग एकटीच कशी तू, दु:खात वाहलेली...

रात मला म्हणाली...

तुझ्याही तर भोवती, माणसांचा गराडा,
मग तूही रात्र रात्र, का जागून काढलेली...

मी विचारात पडलो अनं धाय मोकलून रडलो
भोवती होती माझ्या, जीर्ण वृक्ष वाढलेली...

कुणी तरी आपलं हवं होतं मला
अनं हवी होती नाड जोडलेली

मी आकाशी बघितलं, रात सूनी शी दिसली
रात चन्द्राविन होती, गच्च अंधारलेली...

No comments:

Post a Comment