Friday, March 28

जख्मी..

प्रेम
बघतेस न चुकता आणि
क्षणात नजरा वळतात
कसा सांगू प्रिये
आसवे हृदयातून गळतात

खरच इथे चालतांना
हजारो अळखळतात
हृदये जेव्हा तुटतात
सारेच तडफडतात

तुझ्या डोळ्यातील आसवे
आठवतात, छळतात
जणू गुलाबाच्या पाकळ्या
कोमेजून पडतात

मित्रहो प्रेमात पडलेले
सगळेच रडतात
या जखमांतील वेदना
फक्त जखमींनाच कळतात ...

मितवा ना बचा...

कभी लगा कि गम निगल ना जाये हमें
गम दूसरों का देखा तो कोई शिकवा ना बचा..

हम अकेले ही नहीं है टुकड़ो में ढलने वाले
जिनका आज तारीख में कोई मितवा ना बचा...

खैर खुश है कि नशा उतर गया
आज महोब्बत का यहाँ मैकदा ना बचा...

पहले भी थी, अब भी नम है आँखें
दर्द कि बाँहों में कोई अपना ना बचा...

ला उम्र हमने उनकी याद में निकाली हैं
अब देख सके ऐसा कोई सपना ना बचा...

अच्छा है कि दिल ख़ामोशी से टूटते हैं
दिल कि चीखे सुनने वाला यहाँ कारवां ना बचा....

Thursday, March 27

जागृत ??


भारत माझा देश आहे
हि प्रतिज्ञा कालबाह्य ठरत आहे
देश ठेल्यांवर विक्रीस मांडलेला पाहून
असे जनता ग्राह्य धरत आहे
"राजनीतीच भ्रष्ट आहे" म्हणायचा
अधिकार कायद्याने दिलेला आहे
आणि म्हणतांना मात्र विसरतो
"भ्रष्टांचा" आम्हीच पुरस्कार केलेला आहे
दर पाच वर्षांनी युद्ध पेटते येथे
अशा अनेक युद्धांना देश सामोरे गेलेला आहे
गोळी शरीर न चिरतात हृदय छेदते
तेव्हा अंतर यातनेनच भारतीय मेलेला आहे
पण भातुकलीच दोर आता आम्ही हातात घेऊ
हातपाय हलवायचा वेड लागलेला आहे
नाही म्हणता म्हणता किती दिवसांनी
भारतीय माणूस जागलेला आहे
"मी" चे आम्ही होऊन दाखवू
युवा रक्ताला चेव फुटलेला आहे

"भारत आमचा देश आहे"
संदर्भ: हा आत्ताच झोपेतून उठलेला आहे...

उशीर झाला

हळूहळू समजले, जरा उशीर झाला
सर्वांपूढे उभा मघाशीच होतो...
चालले काय म्हणत सावल्यांसमोर
बडबडणारा तो मीच होतो...

अरे च्यायला जखमेवर याच्या
खपली चढली, दुरुस्तही झाली...
अरे हो, मघा त्याच्या जखमेवर
तडफडणारा तो मीच होतो...

नाही, इथे आम्ही खेचत नाहीत
पाय वर चढणार्यांचे..
पण लक्षात आले, उंचावरून
तोंडघशी पडणारा मीच होतो...

अरे हेच तर ते आहेत
दिवस मशाली पेटवणारे...
अनं यांच्यात तमचिरागत
धडपडणारा तो मीच होतो...

आत्ताच माझी प्रेतयात्रा गेली
त्यात एकटा हळहळनारा मीच होतो...
ती धुमसत आहे बघ चिता एकटीच
त्यात जळणाराही  मीच होतो...

नजरभेट

ह्या अफाट नभामध्ये आसवे दडली किती
मजसवे वसुधेसाठी ढग रडली किती
माझ्या जखमेतील वेदना तुला कळली किती
पापण्यामागून आसवे माझ्या पडली किती
प्रत्येक ठेचेसरशी पाऊले अडखळली किती
सहाऱ्यावाचून माझ्या वाट तुझी नडली किती
व्रण माझे बघाया नजर तुझी वळली किती
फक्त एका नजरभेटीला अनाहत श्वास अडली किती....