Sunday, August 10

मला जगायचं होतं

काही क्षण निवांत बसायचं होतं...
आठवून दु:ख पुन्हा हसायचं होतं...

आसवांची किंमत समजली होती...
अक्षांमधेच कुठं लपवायचं होतं...

दिवसाची किलबिल नेहमीचीच होती...
रात्रीच्या किर्कीरीत जागायचं होतं...

मी जगावेगळा नाही हे समजलं जेव्हा...
माझं वेगळं जग मला बनवायचं होतं...

जेवढा लढलो तेवढ्या जखमा...
श्वास होता आणखी लढायचं होतं...

मज मारण्याची मरणाची औकात नव्हती...
मी जगलो जिथवर मला जगायचं होतं...
...........................................मी...

No comments:

Post a Comment